
बेलगाम प्राईड / मराठा मंडळ कॉलेज ऑफ फार्मसी बेळगाव येथे संस्थेचे माजी अध्यक्ष कै.मा.नाथाजीराव हलगेकर यांच्या २० व्या स्मृतिदिनानिमित्त मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन दि.२२ रोजी करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात कै. नाथाजीराव हलगेकर यांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली. या प्रसंगी संस्थेचे प्राचार्य डॉ. विष्णू कंग्राळकर, नेत्रदर्शन सूपर स्पेशालिटी नेत्र रुग्णालयाचे डॉ. जगदीश पाटील, श्री. उदय कोलार, डॉ.श्रीदेवी मँडम आणि रुग्णालयाचे तंत्रज्ञ तसेच या उपक्रमाचे कोऑर्डीनेटर श्री. संजय गावडे. प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

या प्रसंगी डॉ. विष्णू कंग्राळकर यांनी कै.नाथाजीराव हलगेकर यांच्या कार्याचा गौरवोद्गार केला. डॉ. जगदीश पाटील आणि उदय कोलार यांनी डोळ्यांची काळजी आणि त्यांचे आरोग्य याविषयी बहुमोल अशी माहिती दिली. त्याच बरोबर संजय गावडे यांनी कै. नाथाजीराव हलगेकर यांच्या कार्याची माहिती दिली.

या उपक्रमांतर्गत मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. तपासणीसाठी खास नेत्रतज्ज्ञांचे पथक उपस्थित होते. कॉलेजच्या विद्यार्थ्यांसह परिसरातील नागरिक आणि कॉलेजच्या कर्मचाऱ्यांनी या शिबिराचा लाभ घेतला. हा सामाजिक उपक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी महाविद्यालयीन प्रशासन कोऑर्डिनेटर श्री संजय गावडे आणि सेवकवर्ग यांनी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी कै. मा. नाथाजीराव हलगेकर यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.प्रसाद मनगुतकर यांनी केले




