Uncategorized
गोकाक येथील वकील भवन इमारतीच्या कामाची मंत्री जार्कीहोळीनी केली पाहणी

बेलगाम प्राईड / गोकाक शहरात अंदाजे २ कोटी रुपये खर्चून उभारण्यात येत असलेल्या नवीन वकील भवन इमारतीच्या विकासकामांची मंत्री सतीश जार्कीहोळी यांनी सोमवारी पाहणी केली.
यावेळी वकील संघटनेने मंत्र्यांकडे वरच्या मजल्याच्या बांधकामासाठी अतिरिक्त १.५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्याची मागणी केली. या मागणीला प्रतिसाद देत मंत्री सतीश जार्कीहोळी यांनी निधी मंजूर करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.

मंत्री जारकीहोळी म्हणाले की, “एक सुसज्ज भवन उभारले जावे आणि इमारतीचे काम लवकरात लवकर पूर्ण करून लोकांना त्याचा फायदा मिळावा.” तसेच, भवनासाठी आवश्यक असलेल्या सुविधा पुरवण्याचे आश्वासनही मंत्र्यांनी दिले.
यावेळी त्यांनी वकील संघटनेच्या कार्यालयाला भेट देऊन, विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी सादर केलेले निवेदन स्वीकारले.




