हृदयाच्या शस्त्रक्रियेसाठी आर्थिक मदतीचे आवाहन

बेलगाम प्राईड / विनायक नगर येथील अपेक्षा किशन राठोड हे ही सर्वसामान्य कुटुंबातील चार वर्षाच्या बालिकेला जीवदान मिळण्यासाठी तातडीने हृदय शस्त्रक्रियेची गरज असून या हृदयाच्या शस्त्रक्रियेसाठी खर्चिकबाब असल्याने आर्थिक मदतीचे आवाहन करण्यात आले आहे.
वडील किशन राठोड हे कॅम्प बेळगाव येथे कुली काम करतात. मूळचे बागलकोट येथील रहिवासी असलेले राठोड कुटुंबीय गेल्या 20 वर्षापासून बेळगावमध्ये स्थायिक झाले आहेत. त्यांची मुलगी अपेक्षा ही वर्षभराची असल्यापासून सतत आजारी पडू लागल्याने तिची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आणि तिच्यावर यापूर्वी एक शस्त्रक्रिया देखील करण्यात आली आहे.
मात्र त्यानंतरही आजार कमी न झाल्यामुळे पुन्हा एकदा प्रभाकर कोरे हॉस्पिटलमध्ये तिची वैद्यकीय तपासणी करण्यात आली त्यावेळी तिच्या हृदयाच्या पडपेला छिद्र असल्याचे निदर्शनास आल्यामुळे डॉक्टरांनी तातडीने हृदय शस्त्रक्रियेचा सल्ला दिला आहे. सदर रिडो एमव्हीआर (ओपन हार्ट सर्जरी) ही हृदय शस्त्रक्रिया करण्यासाठी जवळपास 3 ते 4 लाख रुपये खर्च येणार आहे.
शस्त्रक्रियेचा हा खर्च गरीब सर्वसामान्य राठोड कुटुंबीयांच्या आवाक्या बाहेर असल्यामुळे त्यांना आर्थिक मदतीची गरज आहे. तरी सामाजिक कार्यकर्त्यांसह दानशूर व्यक्ती आणि सेवाभावी संघ -संस्थांनी पुढाकार घेऊन 4 वर्षीय अपेक्षा हिचा जीव वाचवण्यासाठी आपल्या परीने शक्य होईल तितके सहाय्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
किशन राठोड यांचा मोबाईल क्र. 9740097027 हा असून शस्त्रक्रियेसाठी मदत करू इच्छिणाऱ्यांनी त्यांच्या हनुमाननगर कॅनरा बँक शाखेतील 2912101003379 या क्रमांकाच्या खात्यावर आर्थिक मदत करावी, असे आवाहन करण्यात आले आहे



