कृष्णा नदीच्या पात्रात पाण्याचा पातळीत वाढ पुलावरील वाहतूक बंद

बेलगाम प्राईड /गेल्या काही दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्र व धरण परिसरात सतत पडत असलेल्या पाऊसाने कृष्ण नदीचा पात्रात गेल्या तीन चार दिवसांपासून पाणी वाढत होते मंगळवार दिनांक २९ जुलै रोजी सकाळी सातच्या सुमारास पुलावर पाणी येण्यास प्रारंभ झाला सतत वाढणाऱ्या पातळीने बघता बघता पुलावर सर्वत्र पाणीच पाणी पसरले त्यामुळे लागलीच कुडची पोलिस स्थानकाचे उप निरीक्षक प्रितम नाईक व त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने बॅरिकेट्स लाऊन संपूर्ण वाहतूक बंद केली कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी नदीचा काठावर पोलिसांची नियुक्ती करून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
कृष्णा नदीच्या पात्रात अचानक वाढ झाल्याने पोलिसांनी रस्ता बंद केला त्यामुळे जमखंडी मार्गावरील येऊन मिरज पुणे कडे जाणाऱ्या वाहनचालकांना व कामासाठी जाणाऱ्या कामगारांची मोठी पंचायत यावेळी झाली आहे. अनेक वाहनचालकांना परत जावे लागले कागवाड कलादगी या राज्य महामार्ग वरील वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आली आहे. जमखंडी बागलकोट बनहट्टी तेरदाळ या भाागातून पुणे सांगली मिरज जाणारी वाहने अथणी मार्गाने वळविण्यात आली आहे.
तर रायबाग कडून येणारी वाहतूक अंकली मार्गाने वळविण्यात आली आहे. हा मार्ग बंद झाल्याने लोकांची गर्दी रेल्वे स्थानकावर रेल्वेने प्रवास करण्याकरिता वाढत असून मिरज व सांगली या भागाला अनेक लोक व्यापार दवाखाना व कामाकरीता जातात त्यांना रेल्वेचा प्रवास उपयुक्त असून कुडची रेल्वे स्थानकावर पॅसेंजर व काही जलद गाड्याना थांबा आहे. अन्य काही जलद गाड्याना थांबा देण्याची मागणी करण्यात येत आहे .
कृष्णा नदीच्या पात्रात पाण्याची पातळी वाढत असल्याने तालुका प्रशासनाने नदीकाठावरील गावांना सतर्क राहण्याची विनंती करण्यात येत असल्याचे रायबागचे तहसिलदार सुरेश मुंजे यांनी सांगितले की तालुक्यातील नदीचा काठावर येणाऱ्या सर्व गावात नोडल अधिकारी नेमण्यात आले असून त्यांचा बरोबर त्या गावाचे तलाठी पंचायतीचे कार्यदर्शी यांना गावातच राहण्याचा सूचना देण्यात आल्या असून सर्वांनी गावाचा लोकांशी संपर्क साधावा समस्या उद्भवली तर तालुका प्रशासनाशी संपर्क साधावा असे निर्देश देण्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगितले




