Uncategorized
Trending

मराठी भाषेलाही प्राधान्य द्या ; सतीश जार्कीहोळी यांना निवेदन

बेलगाम प्राईड / बेळगावसह सीमा भागात लागू करण्यात आलेली कन्नड सक्ती त्वरित मागे घ्या अशी मागणी महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागच्या वतीने पालकमंत्री सतीश जार्कीहोळी यांना निवेदनाद्वारे करण्यात आले. रविवारी सायंकाळी गोकाक मुक्कामी जार्कीहोळी यांची बेळगावातील तालुका युवा समितीच्या शिष्टमंडळानी भेट घेऊन ही मागणी करण्यात आली.

मराठी भाषिकांच्या मतावर निवडून आलेल्या मतदार संघातील लोकप्रतिनिधींना निवेदन देण्याची मोहीम तालुका युवा समितीच्या वतीने सुरू करण्यात आली असून यापूर्वी महापौर मंगेश पवार यांना निवेदन देण्यात आले होते. त्यानंतर आज सतीश जार्कीहोळी यांना या संदर्भात निवेदन देऊन मागणी करण्यात आली.

बेळगावसह सीमाभागात होत असलेल्या कन्नड सक्तीला आपण बेळगाव जिल्हाचे पालकमंत्री या नात्याने लक्ष घालून कन्नडसक्ती त्वरित मागे घावी असे निवेदन सादर केले त्यावेळी अध्यक्ष शुभम शेळके यांनी मराठी भाषिकांच्यावर कानडी सक्ती तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. तो अयोग्य असून या आदेशातून विवादित सिमाभागाला वगळून अंमलबजावणी करावी अशी विनंती केली.असता पालकमंत्र्यांनी आपण यांची माहिती घेऊन योग्य निर्णय घेऊन यावर आपण चर्चा करू असे त्यांनी आश्वासन दिले.

यावेळी कार्याध्यक्ष धनंजय पाटील, सरचिटणीस मनोहर हुंदरे, खजिनदार व नगरसेवक शिवाजी मंडोळकर उपाध्यक्ष प्रविण रेडेकर, चंद्रकांत पाटील, महादेव पाटील, शिवाजी हावळाण्णाचे, अभिजित मजुकर, अशोक घगवे, नारायण मुंचडीकर,भागोजीराव पाटील, निपाणी युवा समिती अध्यक्ष लक्ष्मीकांत पाटील, सुनिल किरळे, रंजित हावळाण्णाचे, मोतेश बारदेशकर,सचिन दळवी, गजानना शहापूरकर, सुरज कणबरकर,प्रविण गौडर, सुरज जाधव गणेश मोहिते, निलेश काकतकर, श्रीकांत नादूंरकर, राजू नागेश पावले, दिपक लोहार, अनिल देसूरकर, शुभम जाधव, विनायक कांगले, दिपक गुळेनव्वर, अमोल चौगुले,रोहित वायचळ, विशाल सावंत, अभिषेक कारेकर,किरण नार्वेकर, आनंद तुप्पट, अभिषेक तुप्पट,अक्षय पाटील,नागेश सरफ,सुरज जाधव, ज्ञानेश्वर चिकोर्डे, तब्रेज मस्केवाले, राहूल देसूरकर, पवन खाडे,शेखर कोडेकर,चेतन अजरेकर, दिगंबर खांबले, बसवंत गावडोजी,अनिल घडशी प्रशांत बैलूरकर प्रविण पाटील, यासह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!