
बेलगाम प्राईड /खादरवाडी गावातील शेतकऱ्यांची फसवणूक केल्या संदर्भात वेळोवेळी पोलीस खात्याकडे तक्रारी करूनही न्याय न मिळाल्याने उद्या गुरुवारी सकाळी आयुक्तांची घेणार भेट घेणार आहे.
खादरवाडी गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी दलालाने बळकवण्यात आल्याने ग्रामस्थांनी सतत पोलीस विभागाला यासंदर्भात तक्रारी करण्यात आल्या होत्या मात्र याकडे दुर्लक्ष होऊन ग्रामस्थांवर अन्याय झाल्याने यश मिळवण्यासाठी ग्रामस्थांनी उद्या गुरुवारी सकाळी पोलीस आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून आयुक्तांची भेट घेऊन न्याय मिळवून द्या अशा मागणीचे निवेदन देणार असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे.

सकाळी गावातील सर्व शेतकरी ग्रामस्थांनी जातीने हजर राहून जमीन वाचवण्यासाठी सहकार्य करावे असे गावातील पंचमंडळीने आवाहन केले आहे.




