स्विमर्स क्लबचे वीर सावरकर चषक जलतरण स्पर्धत घवघवीत यश

बेलगाम प्राईड / महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटना आणि कोल्हापूर जिल्हा हौशी जलतरण संघटनेच्या मान्यतेने सावली सोशल सर्कलतर्फे काई येथे आयोजित वीर सावरकर चषक -2025 जलतरण स्पर्धा गाजवताना स्विमर्स क्लब बेळगावच्या जलतरणपटूंनी 24 सुवर्ण, 23 रौप्य, 27 कांस्य पदकांसह एकुण 74 पदके जिंकत उपविजेते पदाची ट्रॉफी हस्तगत केली.
शंकरराव पुजारी जलतरण तलाव, आय.एम.सी. इच्छाकरंजी, कोल्हापूर येथे गेल्या 26 व 27 जुलै रोजी आयोजित स्पर्धेमध्ये स्विमर्स क्लब बेळगावच्या यशराज पावशे, रिचा पवार, समीक्षा घासारी, दर्शिका निट्टूरकर आणि जेनू होंजडकट्टी या नवोदित जलतरणपटूंच्या नेतृत्वाखालील संघाला त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांच्या संबंधित गटांमध्ये वैयक्तिक विजेतेपदाने देखील सन्मानित करण्यात आले. बेळगाव स्वीमर्स क्लबच्या जलतरणपटूंनी मिळविलेले यश पुढीलप्रमाणे (अनुक्रमे नांव, सुवर्ण, रौप्य, कांस्य यानुसार) आहे. ऋचा पवार -6,1, 0. यशराज पावशे -5, 0, 0. समिक्षा घसारी -4, 3, 0. दर्शिका निट्टूरकर -3, 1, 2. सायेशा पाटील -2, 4 , 0. जेनु होंजाडकट्टी -2, 0, 0. वैष्णवी कडाट्टी -1, 4, 0. आराध्या पी. -1,1, 2. वंश बिर्जे -0, 2, 2. अथर्व राजगोळकर -0, 2, 1. ऋत्वी नरसगौडा -0, 2, 0. सायली घुग्रेटकर -0, 1, 5. सकेत एस. होसमठ -0, 1, 2. अद्विका पी. -0, 1, 1. राघव कडाट्टी -0, 0, 5. स्वराली शिवणगेकर -0, 0, 2. स्वर अमृतिया -0, 0, 2. अंश यलजी -0, 0, 2. अर्श चव्हाण -0, 0, 1.

वरील सर्व यशस्वी जलतरणपटू बेळगाव येथील केएलईच्या ऑलिंपिक आकाराच्या सुवर्ण जेएनएमसी स्विमिंग पूलमध्ये पोहण्याचा सराव करून प्रशिक्षण घेतात. त्यांना प्रशिक्षक उमेश कलघटगी, अक्षय शेरेगर, अजिंक्य मेंडके, नितीश कुडुचकर, गोवर्धन काकतकर, महेश पवार, आशिष कुरणकर, इम्रान उचगावकर आणि विनायक आंबेवाडीकर यांचे मार्गदर्शन, तसेच आई-वडिलांसह डॉ. प्रभाकर कोरे (अध्यक्ष, केएलई सोसायटी), जयंत हुंबरवाडी (अध्यक्ष, जयभारत फाउंडेशन), रो. अविनाश पोतदार, श्रीमती मानेक कपाडिया, श्रीमती लता कित्तूर, सुधीर कुसाणे, प्रसाद तेंडोलकर आणि इतरांचा पाठिंबा व प्रोत्साहन लाभत आहे.


