
बेलगाम प्राईड नवी दिल्ली / उज्वल निकम यांची राष्ट्रपती नामनिर्देशित खासदार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. लोकसभा निवडणूक हरल्यानंतर राज्यसभेत राष्ट्रपती कोट्यातून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
उज्ज्वल निकम यांनी २०२४ लोकसभा निवडणूक लढवली होती. उत्तर मध्य मुंबई मतदारसंघात काँग्रसेच्या मुंबई प्रदेशाध्यक्ष वर्षा गायकवाड यांच्याविरोधात त्यांनी लढवलेली निवडणूक चुरशीची ठरली होती. अखेर वर्षा गायकवाड यांनी निसटती आघाडी घेत उज्ज्वल निकम यांचा पराभव केला होता.