
खानापूर-नंदगड मार्गावर रूमेवाडी क्रॉस नजीक झाड कोसळल्याने वाहतूक ठप्प
खानापूर बेलगाम प्राईड/ खानापूर-नंदगड मार्गावर रूमेवाडी क्रॉसजवळ आज दुपारी वादळ-पावसामुळे एक भले मोठे झाड रस्त्यावर कोसळले. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.
सुदैवाने झाड कोसळल्या वेळी कोणतेही वाहन किंवा नागरिक त्या मार्गावरून ये जा नसल्याने मोठा अनर्थ टळला. हा मार्ग नेहमीच गजबजलेला असून वाहनांची व नागरिकांची सतत वर्दळ असते. मात्र झाड पडल्याने वाहतूक अडथळली असून लहान वाहने बाजूच्या कच्च्या रस्त्याने मार्गक्रमण करत आहेत. तथापि, अवजड वाहनांना या मार्गाने जाता येत नाही. या रस्त्यावर झाडाला लागून अनेक झाडे पडण्याच्या स्थितीत आहेत. त्यासाठी वन खात्याने व पीडब्ल्यूडी खात्याने याकडे लक्ष देऊन धोकादायक स्थितीत असलेली झाडे काढण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
वन खात्याने याबाबतची तात्काळ दखल घेतली असून, सध्या वन खात्याचे आर एफ ओ श्रीकांत पाटील यांनी रस्त्यावर पडलेले हे झाड रस्त्यावरून हठविले आहे. त्यामुळे प्रवासी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.




