
बेलगाम प्राईड /9 डिसेंबर 2024 रोजी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने कर्नाटकच्या हिवाळी अधिवेशनला महामेळाव्याचे संभाजी चौक येथे आयोजन करण्यात आले होते यावेळी एकूण 78 लोकांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यातील तपास तपास करतेवेळी 69 लोकांची नाव वगळून एकूण नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला यामध्ये गोपाळ बळवंत देसाई आबासाहेब उर्फ आबाजी नारायणराव दळवी मनोहर कल्लाप्पा किनेकर रामचंद्र चुरामुनी मुदगेकर शंकर परशुराम कोनेरी राजू महादेव किनेकर गोपाळ मुरारी पाटील प्रकाश आप्पाजी मरगाळे माजी आमदार दिगंबर पाटील या नऊ जणांवरती खडेबजार पोलिसांकात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्यांच्यावरती भारतीय न्याय संहिता कलम 189 (२) १९० १९२ २८५ क्रमाने गुन्हा दाखल करण्यात आला होता. खडे बाजारचे सहाय्यक उपनिरीक्षक बी चुडामणी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला होता महाराष्ट्र एकीकरण समिती आणि कन्नड मराठी भाषिक यांच्यामध्ये तेढ निर्माण करण्याचा गुन्हा दाखल केला होता.
तपास अधिकाऱ्यांनी तपास करून जे एन एम सी तिसऱ्या न्यायालयात 400 दाखल केली त्यानुसार या सर्वांना न्यायालयाने समन्स बजावला होता. त्यानुसार सर्वांनी न्यायालयात हजर होऊन या सर्वांच्या वतीने ॲड.महेश बिर्जे यांनी जामीन अर्ज दाखल केला न्यायालयाने शिष्यर्थ जामीन मंजूर केला.
सर्वांच्या वतीने ॲड. महेश बिर्जे एडवोकेट ॲड.एमबी बोंद्रे ॲड. वैभव कुट्रे ॲड.बाळासाहेब कागलकर व ॲड.चौधरी हे काम पाहत आहेत




