बेळगाव जिल्ह्यातील विणकरांच्या समस्येवर मंत्री शिवानंद पाटील यांच्याशी आ.अभय पाटील यांनी केली चर्चा.

बेलगाम प्राईड /गुरुवारी दि. 21 रोजी कर्नाटक सरकारचे साखर आणि वस्त्रोद्योग मंत्री माननीय श्री शिवानंद पाटील यांची आमदार अभय पाटील यांनी बेंगळुर विधान सौध येथे भेट घेतली. राज्यातील विणकरांच्या सध्याच्या समस्या संदर्भात चर्चा करण्यात आली. याला सकारात्मक मंत्र्यांनी प्रतिसाद देण्यात आला.
२०२४-२९ पर्यंत नवीन वस्त्रोद्योग धोरणांतर्गत राज्यातील विणकरांना विशेष अनुदान दिले जाईल नवीन योजना आखल्या जातील आणि हातमाग आणि यंत्रमाग विणकर आणि विणकरांच्या वेतन कामगारांच्या जीवनाला पूरक ठरण्यासाठी काम केले जाईल अशी हमी त्यांनी दिली.

याप्रसंगी सध्याच्या राज्य सरकारच्या १० HP पर्यंतच्या विणकरांना मोफत वीज देण्याची योजना आणि ११ HP ते २० HP युनिट्ससाठी १.२५ पैसे दराने सवलतीच्या दरात योजना करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यामुळे राज्यातील जनतेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले..
माननीय मंत्र्यांनी माननीय वस्त्रोद्योग विकास आयुक्तांशी विशेषतः बेळगाव जिल्ह्यातील विणकरांच्या गंभीर समस्यांवर योग्य ती कारवाई करण्यासाठी बोलले एकूणच, माननीय वस्त्रोद्योग मंत्र्यांच्या प्रतिसादाबद्दल विणकर समुदायाच्या वतीने आभार मानत आले. याप्रसंगी, गजानन गुंजेरी, आनंद उपरी, लोहित मोराकर, संतोष टोपगी, विनायक कामकार आणि प्रवीण अलकुंटे उपस्थित होते.




