बेळगाव शहर विभागातील विविध सरकारी कार्यालयावर लोकायुक्त अधिकाऱ्यांचा छापा!
बेळगाव लोकायुक्तीची आघाडीसाठी राज्यातील विविध जिल्ह्यातील अधिकारी

बेलगाम प्राईड / शहरातील सब रजिस्ट्रार कार्यालयावर लोकायुक्त अधिकाऱ्यांनी मोठी कारवाई केली आहे. बेळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात असलेल्या उत्तर विभागाच्या उपनिबंधक कार्यालयावर हा छापा टाकण्यात आला आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून या कार्यालयातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांविरोधात भ्रष्टाचाराच्या तक्रारी येत होत्या. याच तक्रारींच्या आधारावर लोकायुक्त अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. लोकायुक्त अधिवक्ता शुभवीर जैन यांच्या नेतृत्वाखाली ही धाड टाकण्यात आली असून, वरिष्ठ उपनिबंधक करिबसवनागौडा पी. यांच्यासह कार्यालयातील इतर कर्मचाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. लोकायुक्त अधिकारी सध्या प्रत्येक कागदपत्राची आणि नोंदीची तपासणी करत आहेत.

याबरोबर महानगरपालिकेच्या उत्तर विभागीय कार्यालयात देखील धाड घालून कागदपत्रांची व इतर जनतेच्या तक्रारीवरून तपासणी करण्यात आली अशोकनगर येथे असलेल्या महानगरपालिकेच्या उत्तर विभागाच्या कार्यालया बाहेर जनता थांबूनच होती तपासणी सुरू होती तोपर्यंत नागरिकांचे कोणतेही काम होऊ शकले नाही तात्काळ थांबण्याची वेळ आली होती.

अबकारी विभागाच्या कार्यालयावर लोकायुक्तने धाड घालून कागदोपत्री तपासणी केली तसेच या ठिकाणी प्रत्येक टेबलवर असलेल्या अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात आली जप्त करून ठेवण्यात आलेल्या दारूची ही पाहणी करून त्याचा लोकायुक्त अधिकाऱ्याने अहवाल घेतला.

आरटीओ कार्यालया त लोकायुक्तच्या एका विभागाने धाड घालून तिथे देखील कपाटातील व इतर ठिकाणी ठेवलेल्या कागदपत्रांची तपासणी केली तसेच अनधिकृतपणे असलेल्या पैशाची ही तपासणी करण्यात येत होती. यावेळी आरटीओ कार्यालयाच्या मुख्य दरवाजा बंद ठेवण्यात आला होता या ठिकाणी बंदोबस्ताला पोलिसांची नियुक्ती करण्यात आली होती.
लोकायुक्तच्या आणखीन एका विभागाने जिल्हा रुग्णालयातील तक्रारी असलेल्या प्रस्तुती विभागाच्या ठिकाणी येऊन जनतेच्या तक्रारी ऐकून घेतल्या यानंतर आत मधील होत असलेल्या काळा कारभाराबद्दल चौकशी करण्यात आली यामुळे या चौकशी प्रक्रिया वेळी रुग्णांच्या नातेवाईकांना आतील बाजूस सोडण्यात येत नव्हते यामुळे बाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी वाढलेली होती.
लोकायुक्तांच्या या कारवाईसाठी बेंगलोर बिजापूर बेळगाव मंगळूर अशा विविध विभागातून लोकायुक्तांचे अधिकारी बेळगावत धाड घालून या कारवाया केल्या जात होत्या.




