Uncategorized
Trending

बेळगाव विमानतळाचे होणार काया पलट 

बेलगाम प्राईड / प्रवाशांच्या वाढत्या संख्येमुळे बेळगाव विमानतळाचा लवकरच विस्तार होणार आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाने नवीन टर्मिनलच्या बांधकामासाठी तब्बल ३२२ कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे.

या संदर्भात, कर्नाटकातील खासदार इराण्णा कडाडी यांनी राज्यसभेत प्रश्न विचारला होता. त्याला उत्तर देताना, केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले सध्या बेळगाव विमानतळ देशांतर्गत विमानसेवा पुरवतो.

येथील धावपट्टीची लांबी २,३०० x ४५ मीटर असून ती एअरबस ए-३२० सारख्या मोठ्या विमानांनाही हाताळू शकते. सध्याच्या टर्मिनलची वार्षिक प्रवासी हाताळणी क्षमता ८ लाख आहे. नवीन टर्मिनलचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर विमानतळाची क्षमता वार्षिक ३५ लाख प्रवाशांपर्यंत वाढेल असे मंत्र्यांनी सांगितले.

गेल्या काही वर्षांत बेळगाव विमानतळावरील प्रवासी आणि मालवाहतुकीत सातत्याने वाढ झाली आहे. २०२२-२३ मध्ये विमाने ३ लाख प्रवाशांचा प्रवास झाला आहे तर मालवाहतूक ३७ मेट्रिक टन होती. त्यानंतर, २०२३-२४ मध्ये प्रवाशांची संख्या वाढून ३.१ लाख झाली, तर मालवाहतूक १२ मेट्रिक टन इतकी नोंदवली गेली. या वाढीचा कल कायम राहिला आणि २०२४-२५ मध्ये प्रवाशांची संख्या ३.४ लाखांवर पोहोचली, तर मालवाहतूक २४ मेट्रिक टन झाली.

बेळगावला आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून घोषित करण्याच्या शक्यतेवर बोलताना, मंत्र्यांनी स्पष्ट केले की असे निर्णय वाहतुकीची क्षमता आंतरराष्ट्रीय मार्गांसाठी एअरलाईनची मागणी, तसेच आवश्यक पायाभूत सुविधा जसे की धावपट्टीची लांबी, इमिग्रेशन, आरोग्य आणि क्वारंटाइन सुविधांवर अवलंबून असतात.

मंत्री मोहोदयांनी सांगितले की १९९४ मध्ये ‘एअर कॉर्पोरेशन ॲक्ट’ रद्द झाल्यामुळे विमान कंपन्यांना त्यांचे मार्ग निवडण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे. बेळगावमधून सेवा सुरू करणे किंवा न करणे हे संबंधित विमान कंपनीच्या व्यावसायिक आणि कामकाजाच्या व्यवहार्यतेवर अवलंबून असेल विमानतळ प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी लागणारा वेळ जमीन संपादन सरकारी परवानग्या आणि निधीची उपलब्धता यांसारख्या अनेक घटकांवर अवलंबून असते असेही त्यांनी स्पष्ट केले.

बेळगावमधील वाढत असलेले प्रवासी संख्या आणि ३२२.४५ कोटी रुपयांच्या विस्ताराच्या कामामुळे, आगामी काळात हे शहर उत्तर कर्नाटकातील हवाई प्रवासाचे एक महत्त्वाचे केंद्र म्हणून विकसित होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!