मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला सहकार्यासाठी बेळगावात मराठा समाजाचा मोर्चा

बेलगाम प्राईड/मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी महाराष्ट्रात मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईमध्ये आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला सहकार्यासाठी बेळगाव मध्ये मराठा सकल समाजाचा भव्य प्रमाणात मोर्चा काढण्यात आल्या.

या मोर्चाला शिवाजी गार्डन येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे प्रथम पूजन करून मोर्चाला प्रारंभ करण्यात आला एसपीएम रोड मार्गे कपिलेश्वर उड्डाणपूल, पाटील गल्ली, हेमू कलानी चौक, येथून टिळक चौक, रामलिंग खिंड गल्ली, मार्गे धर्मवीर संभाजी चौक येथे सांगता झाली यानंतर धर्मवीर संभाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करून मान्यवरानी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केला.

मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी दलित संघर्ष समितीनेही यामध्ये भाग घेऊन मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी पाठिंबा जाहीर करून मूक मोर्चा मध्ये सहभागी झाले होते. पावसाचे वातावरण असूनही मोर्चामध्ये सहभागी झालेल्या मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी पावसाची पर्वा न करता भिजत हा मोर्चा यशस्वी केला.




