
बेलगाम प्राईड दि .४/बजाज पल्सर या दुचाकीवरून जात असताना अचानक शॉर्टसर्किटने आग लागल्याने गाडीच्या समोरील भाग जळून खाक झाला यामध्ये कुणासही दुखापत झाली नाही ही घटना आज सोमवारी रात्री सव्वा अकराच्या दरम्यान मराठा मंदिर रेल्वे उड्डाणपूल येथे घडली.
कृष्णा शर्मा राहणार अझम नगर हा युवक बजाज पल्सर क्रमांक केए 39 क्यू 2017 यादुचाकीवरून जात असते वेळी अचानक सोमवारी रात्री अकराच्या दरम्यान अचानक इंजिनच्या समोरील भागास आगीन पेट घेतल्याने त्या दुचकी चालकास काहीच सुचले नाही. लागलीच त्यांनी गाडीवरून उतरून मदतीचा प्रयत्न केला त्यावेळी फरलांगच्या अंतरावर असलेल्या अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पाण्याचा बंब घेऊन दाखल झाले.
पाण्याचे फवारे मारून ही आग आटोक्यात आणण्यात आली यामुळे त्यामध्ये कोणताही दुखापतीचा प्रकार घडला नाही. घटनास्थळी पेटलेली दुचाकी अग्निशामक दलाच्या कार्यालया ठिकाणी ठेवण्यात आली आहे.




