Uncategorized
Trending

धर्मस्थळ अपप्रचाराच्या निषेधात भर पावसात मोर्चा 

बेलगाम प्राईड / गेल्या एक महिन्यापासून हिंदू धार्मिक तीर्थस्थान धर्मस्थळाविषयी निराधार आरोप करून खोटा प्रचार करून धर्मस्थळ नाव कलंकित करण्याच्या घटना घडत आहेत. याचा निषेध नोंदवण्यासाठी मंगळवारी समस्त हिंदू समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला.

या मोर्चाद्वारे भव्य शक्तीचे दर्शन घडले. यावेळी उपस्थित असणाऱ्या मान्यवरांनी सदर मुद्दयाबाबत माहिती दिली. हिंदू धर्मियांचे पवित्र असणाऱ्या धर्मस्थळ क्षेत्राबाबत काही कलंकित व्यक्ती निराधार आरोप करत आहेत. सरकारने या आरोपांची चौकशी करण्यासाठी एसआयटी टीम स्थापन केली होती. तथापि या एसआयटी टीमने केलेल्या तपासात कोणतेही पुरावे आढळले नाहीत. त्यामुळे धर्मस्थळ कलंकित करणाऱ्या व्यक्तींनी केलेले आरोप खोटे आहेत आणि हे आरोप करणाऱ्या व्यक्तींची सखोल चौकशी करावी अशी मागणी करत मंगळवारी बेळगावमध्ये एक मोठा मूक मोर्चा काढण्यात आला.

धर्मवीर संभाजी सर्कलपासून हे निषेध आंदोलन सुरू झाला या मोर्चामध्ये दक्षिणचे आमदार अभय, पाटील माजी आमदार अनिल बेनके, महंतेश कवटगीमठ, संजय पाटील, अँड. मुर्गेंद्रगौडा यांच्यासह हजारो आंदोलकांनी भर पावसात भिजत जिल्हाधिकारी कार्यालयात पोचून  जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.

या निषेधार्थ परमपूज्य श्री जगद्गुरू पंचम शिवलिंगेश्वर महास्वामी, सिद्धसंस्थान मठ, निडसोसी. परमपूज्य श्री चंद्रशेखर शिवाचार्य स्वामी, गुरुशांतेश्वर हिरेमठ, हुक्केरी. परमपूज्य श्री संपदान महास्वामी, संपदान चारमूर्ती मठ, चिक्कोडी. परमपूज्य श्री नीलकंठ महास्वामी, महंतदुरडूआडेश्वरा मठ, मुरगोड परमपूज्य श्री प्रभुनीलकंठ महास्वामी, मुरुसाविरा मठ, बैलहोंगल. परम पूज्य श्री गंगाधर महास्वामी, मदिवलेश्वर मठ, होसूर.. परम पूज्य श्री मुरुगेंद्र महास्वामी, सोमशेखर मठ, मुनावल्ली. परमपूज्य श्री मल्लिकार्जुन शिवाचार्य, मूळ मठ, सौदत्ती परमपूज्य श्री चन्नबसव देवा, रुद्रस्वामी मठ, भालकी आवरोली. परमपूज्य श्री शिवसोमेश्वर शिवाचार्य, मुक्तीमठ, भूतरामनहट्टी, परमपूज्य शिवानंद भारती महास्वामी, साधुसंस्थान मठ, इंचल. परमपूज्य शिवपुत्र महास्वामी, सिद्धरुधामठ, चिक्नमुनावल्ली. परमपूज्य शिवमूर्ती स्वामीजी अरलिकट्टी, परमपूज्य रुद्रकेसरी मठ स्वामीजी हिंडलगा, परमपूज्य शिवानंद शिवाचार्य स्वामीजी मुतनाल, परमपूज्य शिवानंद स्वामीजी निलजगी, परमपूज्य बडेकोळमठ स्वामीजी, परमपूज्य चन्द्र शेखर स्वामीजी विनायक नगर हिंडलगा, स्वामी आत्मप्रभानंदजी, सचिव रामकृष्ण मिशन आश्रम आणि इतर स्वामीजी यांच्या सानिध्यात हा मुख्य निषेध मोर्चा काढण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!