Uncategorized
Trending

दिग्दर्शक अनुप जत्राटकर यांचे निपाणीत जल्लोषात स्वागत 

बेलगाम प्राईड /निपाणी येथील लेखक व दिग्दर्शक अनुप जत्राटकर यांना ‘गाभ’ या मराठी चित्रपटासाठी ‘सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक’ हा पुरस्कार प्रदान करून मुंबई येथे सन्मानित करण्यात आल्याबद्दल निपाणीच्या या सुपुत्राचे निपाणीत मिरवणुकीने जल्लोषात स्वागत करण्यात आले.

मुंबई येथे पुरस्कार स्वीकारून परतलेल्या अनुप यांनी सर्वप्रथम निपाणी बस स्थानकाच्या ठिकाणी छ.संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर निफाड येथील मुख्य रस्त्यावरून त्यांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली नगरपालिकेजवळ आल्यानंतर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी अनुप जत्राटकर यांचे निपाणीकरांनी भव्य स्वागत करून त्यांचा जाहीर सत्कार केला. याप्रसंगी माजी आमदार प्रा.सुभाष जोशी, प्रा. डॉ.अच्युत माने, अविनाश कट्टी, प्रा.बाळासाहेब सूर्यवंशी, प्रा. एन. डी. जत्राडकर, प्रा.नानासाहेब जामदार, डॉ.राजेश बनवन्ना, आनंद संकपाळ, जयराम मिरजकर, सुनील कांबळे आदींसह परिसरातील अनेक मान्यवर लोक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!