Uncategorized

इंटरॅक्ट क्लबचा पदग्रहण समारंभ उत्साहात 

बेलगाम प्राईड / रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणच्या सहप्रायोजकत्वाखाली तात्यासाहेब मुसळे कन्नड प्राथमिक शाळा, प्रभाग क्र.११, बेळगाव येथे बनशंकरी इंटरॅक्ट क्लबचा पदग्रहण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. हा सोहळा युवा नेतृत्व व सेवाभावना यांचे प्रतीक ठरला.

या कार्यक्रमाचे संस्थापन अधिकारी रोटे. अॅड. विजयलक्ष्मी मण्णीकेरी यांनी नूतन पदाधिकाऱ्यांची शपथविधी केली व त्यांना त्यांच्या कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्यांनी आपल्या भाषणात सेवाभाव, नेतृत्व व चारित्र्य विकासाचे महत्त्व अधोरेखित केले.

शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. शिल्पा कवडी यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले व शाळेतील विद्यार्थ्यांसाठी रोटरीच्या योगदानाचे कौतुक केले. इंटरॅक्ट मेंटर सौ. नेत्रावती मिराशी यांनी इंटरॅक्ट क्लबच्या कार्याविषयी व गेल्या कार्यकाळातील यशांविषयी माहिती दिली.

नूतन कार्यकारिणी पुढील प्रमाणे इंट्र. पूर्वी तेलगीनमणी – इंटरॅक्ट अध्यक्ष, इंट्र. युवराज अंगवाडी – इंटरॅक्ट सचिव रोटे. कावेरी करूर, क्लब सचिव, रोटे. कोमल कोळीमठ, न्यू जनरेशन डायरेक्टर, रोटे. पुष्पा पर्वतराव, इंटरॅक्ट चेअरपर्सन रोटे. सविता वेसणे व रोटे. शीला पाटील रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणचे सदस्या उपस्थित होत्या त्यांनी देखील उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.

विशेष अतिथी म्हणून हॉकी बेळगावचे सचिव सुधाकर चाळके यांनी विद्यार्थ्यांना शिस्त व सेवाभावाचे महत्त्व पटवून दिले. रोटे. प्रकाश कालकुंद्रीकर उपस्थित होते. कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने व आभार प्रदर्शनाने करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!