Uncategorized
Trending

केवळ पाच तासांत खुणाचा तपास लावण्यात पोलिसांना यश

बेलगाम प्राईड /कंग्राळी रोड सदाशिवनगर लक्ष्मी कॉम्प्लेक्स जवळ धारेधार शस्त्राने वार करून महिलेचा खून करण्यात आलेल्या प्रकरणाचा तपास केवळ ५ तासांत लावून आरोपीना गजाआड करण्याची कामगिरी एपीएमसी पोलिसांनी केली आहे.

मंगळवारी सकाळी सदाशिवनगर जवळ लक्ष्मी कॉम्प्लेक्स नजीक महादेवी करेन्नावर या महिलेचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला होता त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत या खून प्रकरणाचा उलगडा लावण्यात आला आहे. पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी बुधवारी सायंकाळी पत्रकार परिषदेत सदर खून प्रकरणाची माहिती माध्यमांना दिली. उसने घेतलेले पैसे परत न दिल्याने हा खून झाला आहे. अशी माहिती पोलीस आयुक्तांनी पत्रकार परिषदेत सांगितली मेसमध्ये स्वयंपाकाचे काम करणाऱ्या श्रीमती महादेवी बागप्पा करेन्नावर (वय 42) रा. सदाशिव नगर, 1ला क्रॉस, बेळगाव अशी त्या महिलेची ओळख आहे. यांच्याशी परिचित असलेला आरोपी संतोष थावरू जाधव (वय 38, रा. श्रीनगर, बेळगाव) याने दीड वर्षांपूर्वी त्यांच्याकडून कर्जाच्या रूपात 10,000 रुपये घेतले होते. सदर रक्कम त्या महिलेने परत मागितली वारंवार त्रास देणाऱ्या आरोपीने याच कारणावरून काल दिनांक 05 रोजी मंगळवारी रात्री 11:09 वाजता सदाशिव नगर येथील इंडियन पेट्रोल पंपाजवळील रस्त्यावर श्रीमती महादेवी यांच्याशी वाद घालून लोखंडी रॉडने डोक्यावर मारहाण करून त्यांचा खून करून पळून गेला होता.

डीसीपी नारायण बरमणी यांच्या मार्गदर्शनाखाली मार्केट उपविभागाचे एसीपी संतोष सत्यनायक, सहाय्यक पोलीस आयुक्त, मार्केट उपविभाग, बेळगाव यांच्या नेतृत्वाखाली दोन स्वतंत्र पथकांनी, ज्यात यू. एस. अवटी, पी.आय., एपीएमसी ठाणे आणि जे. एम. कालमिर्ची, पी.आय., माळमरुती पोलीस ठाणे यांचा समावेश होता त्यांनी तपास करून त्वरित कारवाई करत खून झाल्याच्या 5 तासांत पळून गेलेल्या आरोपीला पकडण्यात यश मिळवले. आरोपीला अटक करून खूनासाठी वापरलेला लोखंडी रॉड जप्त करण्यात आला असून त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू आहे.

या प्रकरणाचा त्वरित तपास करून यशस्वीपणे उकल करणाऱ्या संतोष सत्यनाइक, एसीपी, मार्केट, यू. एस. अवटी, पी.आय., एपीएमसी, जे. एम. कालमिर्ची, पी.आय., माळमरुती, तसेच एस. आर. मुत्तत्ती, पी.एस.आय., एपीएमसी, होन्नप्पा तळवार, पी.एस.आय., माळमरुती ठाणे, हुसेन केरूर, पी.एस.आय., मार्केट ठाणे आणि एपीएमसी ठाण्याचे कर्मचारी एम. ए. पटेल, ए.एस.आय., बी. एम. नरगुंद, सी.एच.सी., व्ही. डी. बाबानगर, सी.एच.सी., गोविंद पूजारी, सी.पी.सी., नामदेव लमाणी, माळमरुती ठाण्याचे मारुती कुरेर, सी.एच.सी., गोविंद लमाणी, सी.पी.सी., पारूक मयूर, सी.पी.सी., आणि मार्केट ठाण्याचे मुत्तू बम्मनाळ, कार्तिक जी. एम. यांच्या पथकाचे बेळगाव शहराचे मान्यवर पोलीस आयुक्त आणि डीसीपी यांनी कौतुक केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!