लैंगिक अत्याचार आरोपीच्या नातेवाईकांची मुलीच्या नातेवाईकांना धमकी
संरक्षणासाठी मुलीच्या नातेवाईकांचे पोलिस आयुक्तांना निवेदन

बेलगाम प्राईड : येथील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याच्या घटनेने बी. के. कंग्राळी परिसरात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणात आरोपीला पोलिसांनी अटक करून हिंडलगा कारागृहात जेरबंद करण्यात आले आहे. तरी पीडित मुलीच्या कुटुंबीयांना आरोपीच्या नातेवाईकांकडून शिवीगाळ व धमकावण्याचे प्रकार सुरू असल्याचा आरोप मुलीच्या नातेवाईकाने करण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर श्री विश्वकर्मा सेवा संघ बेळगाव यांनी मुलीच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त करून धमकवणाऱ्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. संघाचे सदस्यांनी पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे तसेच काकती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश शिंगी यांची भेट घेऊन संरक्षण देण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
संघाचे अध्यक्ष रमेश देसूरकर, उपाध्यक्ष नामदेव लोहार, सचिव वैजनाथ लोहार, शिल्पी अध्यक्ष किरण सुतार, संदीप मंडोळकर, श्रीधर लोहार, दिनेश सुतार, प्रकाश कम्मार, विनायक लोहार, विनायक सुतार यांच्यासह महिला समितीच्या अध्यक्षा गीता लोहार, दिव्याश्री सुतार, रेणुका सुतार, अश्विनी निलजरकर व अन्य सदस्य उपस्थित होते.




