
बेलगाम प्राईड / मनोरुग्ण झालेल्या बेळगाव येथील बिम्स वसतिगृहात शिकणाऱ्या एका वैद्यकीय विद्यार्थिनीने औषध सेवन करून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी रात्री नऊच्या दरम्यान घडली.
प्रिया कार्तिक (वय २७) असे तिचे असून ती विद्यार्थिनी बंगळुरू येथील रहिवासी आहे. या संदर्भात मिळालेल्या अधिक माहितीनुसार सोमवारी संध्याकाळपर्यंत जिल्हा रुग्णालयात रुग्ण तपासणीचा अभ्यास करणाऱ्या प्रियाने रात्री आत्महत्या केली. काही दिवसांपूर्वीही तिने आत्महत्येचा प्रयत्न केला होता अशी माहिती समोर आली आहे.
घटनास्थळी भेट दिलेले बिम्सचे संचालक अशोक शेट्टी यांनी सांगितले की, बंगळुरू येथील वैद्यकीय विद्यार्थिनी प्रिया कार्तिक मानसिक आजाराने ग्रस्त होती. त्यामुळे ती नैराश्य होवून तिने हा प्रकार केला असावा असा देखील संशय व्यक्त केला जात आहे. विद्यार्थिनीने औषध सेवन करून आत्महत्या केली की नाही हे शवविच्छेदनानंतर कळेल. एपीएमसी पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.




