
बेलगाम प्राईड /मराठा मंडळ संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत पार पडली यावेळी मराठा मंडळच्या अध्यक्षपदी डॉ. राजश्री नागराजू हलगेकर यांची फेर निवड करण्यात आली त्याचबरोबर अतिवृत्त सादर करून त्याला सदस्यांनी मंजुरी दिली पॉलिटेक्निक कॉलेजच्या सभागृहात झालेल्या सभेमध्ये सन 2024 – 25 चे वार्षिक अहवाल लेखापरीक्षा जमाखर्च व ताळेबंद पत्रक यांना मंजुरी दिली.
सन 2025 – 26 च्या अंदाज पत्रकास सभेने मंजुरी दिली तसेच डॉ. राजश्री नागराजू यांनी इंजिनिअरिंग कॉलेजला राज्य सरकारकडून दहा कोटी ग्रँड मंजूर करून आणल्याबद्दल रामचंद्र मोदकेकर यांनी अभिनंदनाचा ठराव मांडला शनिवारी मराठा मंडळ कार्यकारी समितीची बैठक लक्ष्मणराव सैनूचे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
2025- 26 सालाकरिता डॉ. राजश्री नागराजू यांची अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी दिनकर यांची निवड करण्यात आली राजश्री नागराजू या गेल्या वीस वर्षापासून अध्यक्षपदावर आहेत मराठा मंडळ विश्वस्त समितीची बैठक अनंतराव हलगेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. 2025 – 26 ते 2027-28 करिता कार्यकरणी विश्वस्त म्हणून उर्मिला तरळे व उपकार्यकारी विश्वस्त म्हणून रामचंद्र मोदगेकर यांची निवड करण्यात आली.




