
बेलगाम प्राईड / मराठा युवक संघ आयोजित आबा स्पोर्ट्स क्लब व हिंद स्पोर्ट्स क्लबच्या सहकार्याने प्रतिवर्षीप्रमाणे कै.एल आर पाटील यांच्या स्मरणार्थ मराठा युवक संघाच्या 20 व्या भव्य आंतरशालेय व आंतर विद्यापीठ जलतरण स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे.
गोवावेस येथील महानगरपालिकेच्या जलतरण तलावात 13 व 14 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात येणार आहे. या बैठकीत मराठा युवक संघाचे अध्यक्ष बाळासाहेब काकतकर यांनी हा प्रस्ताव मांडला व सर्वांनी याला मंजुरी दिली. यावेळी मराठा युवक संघाचे पदाधिकारी शिवाजीराव हंगीरगेकर, मारुती देवगेकर,चंद्रकांत गुंडकल,नारायण किटवाडकर, सुहास किल्लेकर,शेखर हांडे जलतरण प्रशिक्षक विश्वास पवार हे उपस्थित होते.

यावेळी संघाचे सेक्रेटरी चंद्रकांत गुंडकल यांनी गोवा,महाराष्ट्र,कर्नाटक येथून अनेक उत्कृष्ट जलतरणपटू सहभागी होणार आहेत त्याबरोबर बेळगावच्या सर्व शाळेच्या जलतरणपटूनी मोठ्या संख्येने या स्पर्धेत सहभाग घेऊन ही स्पर्धा यशस्वी करावी असे आव्हान करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी मनपा जलतरण तलाव गोववेसचे प्रशिक्षक विश्वास पवार यांच्याशी संपर्क साधावा.




