Uncategorized
Trending

पोत्यातून तलवार घेऊन जाणाऱ्या एकाला सुभाषनगर येथे अटक

बेलगाम प्राईड/ बेळगाव मध्ये होत असलेल्या चाकू हल्ल्याच्या घटना वाढत आहेत अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी स्थापण्यात आलेल्या पोलिसांच्या चाकू हल्ला पथकांपैकी एका पथकाने मंगळवारी सुभाषनगर येथे एका इसमाला अटक करून त्याच्याकडील तलवार जप्त करण्यात आली.

जुबेर अब्दुलवहाब शेख (वय 36) रा. सहावा क्रॉस आझादनगर, बेळगाव) असे अटक केलेल्या युवकाचे नाव आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जुबेर हा काल मंगळवारी सुभाषनगर येथील मराठा मंडळ कॉलेज परिसरात संशयास्पद रित्या फिरतेवेळी पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची सखोल तपासणी केली असता त्याच्याजवळ असलेल्या एका पोत्यामध्ये धारेदार हत्यार म्हणजेच तलवार आढळून आले

मार्केट पोलीस ठाण्याच्या चाकू हल्ला पथकाचे पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल हावन्नवर व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्याला कारवाई करून त्याच्या जवळील तलवार जप्त करून जुबेर शेख याला अटक केली. याप्रकरणी मार्केट पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!