सर्व लोकसेवा फाउंडेशनला नवी रुग्णवाहिकाची भेट

बेलगाम प्राईड / सामाजिक आणि धार्मिक कार्यात उल्लेखनीय कामगिरी करत वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या सर्व लोकसेवा फाऊंडेशनला बसवण कुडची येथील निळकंठय्या राचय्या हिरेमठ शास्त्री यांनी रुग्णवाहिका भेट दिली. त्यामुळे फाऊंडेशनच्या कामाला मोठा हातभार लागला आहे.
हिंदू देवतांच्या भग्न प्रतिमांच्या संकलनासह सर्व लोकसेवा फाउंडेशनकडून अध्यक्ष वीरेश हिरेमठ यांच्या नेतृत्वाखाली रुग्णसेवाही करण्यात येते. गरजूंना आरोग्य सेवा देण्यात येते. या कामासाठी आपण सर्व लोकसेवा
बसवण कुडची : रुग्णवाहिकेच्या पूजनप्रसंगी निळकंठय्या हिरेमठ शास्त्री, वीरेश हिरेमठ, प्रशांत घोडके व इतर. फाउंडेशनला रुग्णसेवा भेट दिली आहे. त्यामुळे वीरेश हिरेमठ यांना मदत होईल अशी आशा निळकंठय्या हिरेमठ शास्त्री यांनी व्यक्त केली.
वीरेश हिरेमठ यांच्याकडे रुग्णवाहिकेच्या चाव्या सुपूर्द करण्यात आल्या फाऊंडेशनच्या कामात या रुग्णवाहिकेमुळे मोठी मदत होणार आहे. पण आमची जबाबदारीही वाढली आहे. अशी भावना अध्यक्ष वीरेश हिरेमठ यांनी व्यक्त केली. यावेळी प्रशांत घोडके व इतर उपस्थित होते.




