Uncategorized
Trending

मराठा सेंटर आर्मी पब्लिक स्कूलच्या एनसीसी युनिटचे उद्घाटन उत्साहात

बेलगाम प्राईड/ बेळगाव येथील मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर (एमएलआयआरसी) येथील आर्मी पब्लिक स्कूलमधील एनसीसी युनिट, 168/26 कर्नाटक बटालियन एनसीसीचा उद्घाटन समारंभ आज शुक्रवारी दिमाखात पार पडला. सदर समारंभास उदघाटक म्हणून एमएलआयआरसी कमांडंट आणि एपीएसचे अध्यक्ष ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी उपस्थित होते.

त्यांच्या हस्ते आर्मी पब्लिक स्कूलच्या एनसीसी युनिटचे उदघाटन करण्यात आले. याप्रसंगी सन्माननीय अतिथी म्हणून एनसीसी ग्रुप मुख्यालय बेळगावचे कर्नल मोहन नाईक, 26 कर्नाटक बटालियन एनसीसीचे कमांडिंग ऑफिसर कर्नल सुनील डागर आणि एपीएसचे स्टाफ ऑफिसर लेफ्टनंट कर्नल अरुण मॅथ्यू उपस्थितीत होते. या समारंभात शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती रुपिंदर कौर चहल यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी देशभक्ती, शिस्त आणि एकता दर्शविणारा एक उत्साही सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. भविष्यात विस्तार करण्याच्या योजनांसह यंदाच्या पहिल्या वर्षी एकूण 50 विद्यार्थी शाळेच्या एनसीसी युनिटमध्ये स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले आहेत.

आपल्या उदघाटनपर भाषणात ब्रिगेडियर मुखर्जी यांनी युवा एनसीसी छात्रांना शिस्त, समर्पण आणि राष्ट्रसेवेची मूल्ये जपण्याचे आवाहन केले. त्यांनी नेतृत्वगुण आणि चारित्र्य निर्माण करण्यात एनसीसीची महत्त्वाची भूमिका अधोरेखित केली. विद्यार्थ्यांना राष्ट्र उभारणीत अर्थपूर्ण योगदान देण्यासाठी प्रेरित केले. या एनसीसी युनिटची स्थापना आर्मी पब्लिक स्कूलसाठी (एपीएस) एक महत्त्वाचा टप्पा असून ज्यामुळे विद्यार्थ्यांना समाज सेवा, साहसी उपक्रम आणि नेतृत्व विकासात सहभागी होण्यासाठी नवीन मार्ग खुला झाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!