
बेलगाम प्राईड : कर्नाटकातील सर्व सरकारी आणि खाजगी शाळांना २० सप्टेंबर ते ७ ऑक्टोबर या कालावधीत दसऱ्याची सुट्टी जाहीर करण्यात आल्या आहेत. राज्य शिक्षण विभागाने यासंदर्भात घोषणा केली असून, यामुळे विद्यार्थ्यांना एकूण १८ दिवसांची सुट्टी मिळणार आहे.
शिक्षण विभागाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार, शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच शाळांचे कामकाज आणि सुट्ट्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात येते. या परंपरेनुसार, २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी दसरा दसऱ्याची सुट्टी २० सप्टेंबरपासून सुरू होऊन ७ ऑक्टोबरपर्यंत राहणार आहे.
दसऱ्याची सुट्टी संपल्यानंतर शैक्षणिक वर्षाचा दुसरा टप्पा ८ ऑक्टोबरपासून सुरू होईल, जो २६ एप्रिल, २०२६ पर्यंत चालेल. या सुट्ट्यांचे वेळापत्रक सर्व शाळांना आधीच कळवण्यात आले होते. आणि आता त्यानुसार अधिकृत घोषणा करण्यात आल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.




