
बेलगाम प्राईड/बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्ड चे नवे सीईओ पदी नियुक्त झालेल्या विशाल सारस्वत यांनी बुधवारी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला पहिल्या दिवशी त्यांनी मागील महिन्यात प्रलंबित असलेल्या फाईल मागून त्या चाळून पाहिल्या त्यामुळे रखडलेल्या कामांना गती मिळण्याची शक्यता आहे.
यापूर्वीचे कॅन्टोन्मेंट बोर्डचे सीईओ राजू कुमार यांनी जबलपूर येथे बदली झाली असून त्यामुळे मागील महिनाभर कॅन्टोन्मेंट सीईओपद रिक्त होते त्यांच्या जागी तात्पुरता पदभार बेंगलोर येथील कॅन्टोन्मेंटच्या प्रमुख दिव्या शिवराम यांच्याकडे सोपविण्यात आला होता परंतु त्या देखील काही दिवसाच्या सुट्टीवर गेल्यामुळे गणेश मंडळासह अनेकांना अडचणी आल्या होत्या त्यामुळे कायमस्वरूपी सीईओ देण्याची मागणी होत होती.
काही दिवसांपूर्वीच संरक्षण मंत्रालयाकडून बेळगाव कॅन्टोन्मेंटच्या सीईओपदी विशाल सारस्वती यांची नियुक्ती झाल्याचे पत्र जाहीर करण्यात आले उत्तराखंड येथील हरिद्वार जिल्ह्यात रौकी कॅन्टोन्मेंट बोर्ड मध्ये विशाल सारस्वत कार्यरत होते.
त्यामुळे तेथील पदभार इतरांकडे देऊन ते बुधवारी बेळगावला येऊन आपल्या पदाचा अधिकार स्वीकारला कॅन्टोन्मेंट मधील कारभाराची माहिती घेतली जात आहे. तसेच रखडलेली कामे लवकरच पूर्ण केली जातील असे त्यांनी पत्रकारांसमोर सांगितले त्यांच्या स्वागतासाठी कॅन्टोन्मेंट मधील विविध संघटना तसेच शाळांची शिक्षक उपस्थित होते.




