
बेलगाम प्राईड/ आज दिनांक 24 सप्टेंबर 2025 रोजी मध्यवर्ती सार्वजनिक नवरात्र दसरा महोत्सव महामंडळाच्या वतीने येणाऱ्या 2 ऑक्टोबर 2025 रोजी सीमोल्लंघन कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसंदर्भात बेळगाव मनपा आयुक्त बी. शुभा यांना निवेदन देण्यात आले.
शेकडो वर्षाची परंपरा असलेला बेळगावचा दसरा महोत्सव सालाबाद प्रमाणे “सीमोल्लंघन मैदान” (मराठी विद्यानिकेतन मैदान कॅम्प) येथे विजयदशमीचा उत्सव मोठ्या प्रमाणात म्हैसूरनंतर आपल्या बेळगाव शहर येथे संपन्न होतो. गेल्या काही वर्षांपासून दसरा महामंडळाच्या माध्यमातून शिस्तबद्ध व भव्य स्वरूपात दसरा उत्सव नियोजन होत आहे. यंदाच्या वर्षी सुद्धा हा विजय दशमीचा उत्सव चांगल्यारीतीने नियोजनासाठी महामंडळ प्रयत्नशील आहे. तसंच या संदर्भात बेळगावचे महापौर मंगेश पवार, उपमहापौर वाणी जोशी व बेळगाव उत्तरचे आमदार राजू शेठ यांना पत्र देण्यात आले. याप्रसंगी दसरा महामंडळाचे मानद अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर, अध्यक्ष प्राचार्य आनंद आपटेकर, स्वागताध्यक्ष माजी महापौर मालोजीराव अष्टेकर, जनसंपर्क प्रमुख विकास कलघटगी, कार्याध्यक्ष अंकुश केसरकर, मल्लेश चौगुले, बेळगाव विविध देवस्थानचे पदाधिकारी परशुराम किल्लेकर, श्रीनाथ पवार, मृगेंद्र अंगडी, गौतम पाटील, सुनील बोकडे, आनंद पाटील आदि उपस्थित होते.




