
बेलगाम प्राईड/ कौटुंबिक मालमत्तेच्या वादातून दिराने मोठ्या वहिनीचा धारेदार शस्त्राने वार करून केला खून केल्याची घटना बुधवारी सकाळी गवळी गल्ली टिळकवाडी येथे घडली.
गीता रणजीत डावले (वय 50) रा. गवळी गल्ली टिळकवाडी खुनी आल्यात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. गणेश डावले यांनी हा खुनी हल्ला केला यावेळी त्यांच्या घरातील व आजूबाजूच्या नातेवाईक या ठिकाणी त्या महिलेचा बचाव करण्यासाठी गेले असता त्यांच्यावरही त्या आरोपीने हल्ला करण्याचा प्रयत्न केला.
ही घटना घडताच त्या भागातील संपूर्ण नागरिकांनी एकच गर्दी केली होती या घटनेची माहिती टिळकवाडी पोलिसांना कळताच घटनास्थळी दाखल होऊन आरोपी गणेश डावले याला ताब्यात घेतले आहे. या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही मध्ये हा घडलेला प्रकार कैद झाला आहे.
या ठिकाणी पोलीस आयुक्त भूषण बोरसे उपायुक्त नारायण बर्मनी टिळकवाडी चे पोलीस निरीक्षक पुजारी यांनी भेट देऊन घडलेल्या घटनेची पाहणी केली यावेळी मयत झालेल्या महिलेच्या नातेवाईकांनी पोलीस आयुक्तांना आरोपीच्या संपूर्ण कुटुंबावर कारवाई करा हे कुटुंब अनधिकृतरित्या व्यवसाय करून या भागातील नागरिकांना दमदाटी करत असतात यासाठी या नागरिकांना धोका निर्माण झाला आहे. असे पोलीस आयुक्तांना सांगण्यात आले. या मृतदेहावर जिल्हा रुग्णालयात मृतदेहावर शव चिकिस्थाकरून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला या घटनेचा गुन्हा टिळकवाडी पोलीस संघात नोंद झाला असून पोलीस अधिक तपास करीत आहे




