
बेलगाम प्राईड /दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित ज्योती हायस्कूल कर्ले, या शाळेचे क्रीडा शिक्षक अनंत पाटील यांनी नुकत्याच पार पडलेल्या शारीरिक शिक्षकांच्या राज्यस्तरीय क्रीडा महोत्सवातील गोळा फेक स्पर्धेत प्रथम क्रमांकासह सुवर्ण पदक पटकावले आहे
कर्नाटक सरकार आणि सार्वजनिक शिक्षण खाते बेंगळूर यांच्यातर्फे आयोजित शारीरिक शिक्षकांच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा मंगळूर येथील मुडबिद्री अल्वाज या ठिकाणी सपन्न होत आहेत. या स्पर्धांमध्ये कर्नाटकातील सर्व जिल्ह्यातील क्रीडा शिक्षक सहभागी झाले आहेत. त्यापैकी बेळगांव तालुक्यातील दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित ज्योती हायस्कूल कर्ले या शाळेचे क्रीडा शिक्षक अनंत पाटील यांनी 40 वर्षाखालील वयोगटात गोळा फेक क्रीडाप्रकारात 11.43 मी. इतके अंतर गोळा फेकून सुवर्ण पदक पटकाविले. त्यांना शाळेचे मुख्याध्यापक ए. बी. पाटील तसेच सहशिक्षक, संचालक मंडळ यांचे प्रोत्साहन आणि अथलेटिक्स कोच अशोक शिंत्रे यांचे मार्गदर्शन लाभत आहेत.




