
बेलगाम प्राईड / बेळगाव शहरातील मध्यवर्ती बस स्थानकावरील प्रवाशांचे दागिने चोरणाऱ्या महिला आरोपीला अटक करण्यात मार्केट पोलिसांना यश आले आहे.
मोनीषा मनीगंडण (वय 28) रा. तिरुपहूर, जोलरपट्टी वेल्लोर तमिळनाडू असे या अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत समजलेल्या अधिक माहितीनुसार 18 फेब्रुवारी 2024 रोजी निपाणीच्या ज्योती पाटील या महिलेचे बेळगाव बस स्थानकावर बसमधून खाली उतरत असताना त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करण्यात आले होते.
यासंदर्भात त्यांनी मार्केट पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केली होती. त्या चोरी प्रकरणाचा तपास मार्केट पोलिसांनी लावून तमिळनाडूच्या महिलेला ताब्यात घेऊन तिची सखोल चौकशी केली असता तिने चोरी केल्याचे कबूल केले यावेळी तिच्याकडून पुण्याच्या दागिन्याचा हार जप्त करण्यात आला आहे.
51 ग्रॅम सोन्याचा हार जवळपास पाच लाख 65 हजार किमतीचा असून सदर महिलेकडून जप्त करण्यात आला आहे. मार्केट पोलीस निरीक्षक महंतेश द्यामन्नावर यांच्या नेतृत्वाखाली मार्केट पोलीस कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली सदर चोरट्या महिलेचा तपास लावला आहे. बेळगाव मध्यवर्ती बस स्थानकावरील चोरी प्रकरणाचा तपास लावल्याने पोलीस आयुक्तांनी मार्केट पोलिसांचे अभिनंदन केले आहे.




