Uncategorized
Trending

नंदगड गावच्या तरुण मंडळाचा 66 व्या दीपावली क्रीडा महोत्सव

बेलगाम प्राईड/ तरुण मंडळ नंदगड आयोजित 66 वा दीपावली क्रीडा महोत्सव दिनांक 22 ऑक्टोंबर व 23 ऑक्टोबर 2025 रोजी संपन्न होणार आहे. खानापूर तालुक्यातील नंदगड येथे गेल्या 65 वर्षापासून सतत तरुण मंडळ नंदगड आयोजित दीपावली क्रीडा महोत्सव मध्ये कबड्डी स्पर्धा भरवल्या जातात या कबड्डी स्पर्धेचे नियोजन करण्यासाठी आज लक्ष्मी मंदिर नंदगड येथे तरुण मंडळ नंदगड च्या कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली.

या बैठकीमध्ये 66 वा दीपावली क्रीडा महोत्सवतील कबड्डी स्पर्धा बुधवार दिनांक 22 ऑक्टोंबर व गुरुवार दिनांक 23 ऑक्टोबर 2025 रोजी भरविण्याचे ठरवण्यात आले हे कबड्डी सामने तीन विभागांमध्ये दिवसा खेळवण्याचे ठरविण्यात आले यावर्षी महिला कबड्डी संघांना आमंत्रित करून सामने खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला तसेच 65 किलो वजन गटात खुले कबड्डी सामने व खानापूर तालुका मर्यादित एक गाव एक संघ खुले कबड्डी सामने खेळविले जाणार आहेत

तसेच तरुण मंडळ नंदगडच्या परंपरेनुसार सामाजिक राजकीय शैक्षणिक व औद्योगिक क्षेत्रांमध्ये विशेष कार्य केलेल्या व्यक्तींचा सत्कार सुद्धा या 66 व्या दीपावली क्रीडा महोत्सव मध्ये केला जाणार आहे असे एकमताने ठरविण्यात आले यावेळी राजू पाटील नागो पाटील किरण पाटील स्पर्धेचे पंच के व्ही पाटील के आर पाटील पी आर पाटील दिलीप पाटील सुभाष पाटील सुहास पाटील कृष्णा बिडकर हनुमंत पाटील रमेश पाटील शंकर पाटील कल्लाप्पा पाटील सतीश पाटील राजू पाटील ज्योतिबा हलशिकर रामदास पाटील व लक्ष्मण पाटील आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!