राजू टोपण्णवर यांनी सोशल मीडियावर खोटी माहिती पसरवल्या प्रकरणी यांच्याविरुद्ध तक्रार

बेलगाम प्राईड /महांतेश नगर येथील रहिवासी अय्यूब करीमसाब बागवान (वय 36) यांनी माळमारुती पोलिस ठाण्यात राजू टोपण्णवर यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.
तक्रारीत त्यांनी नमूद केले आहे. की दिनांक ३ सप्टेंबर २०२५ रोजी राजू टोपण्णवर यांनी व्हिडिओ तयार करून फेसबुक, इन्स्टाग्राम आणि इतर सोशल मीडियावर अपलोड करत खोटी माहिती पसरवली. त्या व्हिडिओमध्ये अय्यूब बागवान यांनी एपीएमसी मार्केटमध्ये केळी व्यापारासाठी परवाना घेऊन दुकान सुरू करण्याचा अर्ज केला असून ते एपीएमसी आंदोलनाला पाठिंबा देत आहेत, असा दावा करण्यात आला आहे.
तसेच, जय किसान होलसेल मार्केटच्या सदस्यांनीही परवाना घेऊन दुकान काढावे आणि आंदोलनाला पाठिंबा द्यावा, असे आवाहन व्हिडिओत करण्यात आले. यामुळे त्यांच्या वडिलांचे व स्वतःचे नाव घेऊन जय किसान होलसेल मार्केटच्या सदस्यांमध्ये मतभेद निर्माण केले जात आहेत आणि त्यामुळे स्वतःला, कुटुंबियांना तसेच सदस्यांना मानसिक त्रास होत असल्याचे अय्यूब बागवान यांनी तक्रारीत म्हटले आहे.
याप्रकरणी राजू टोपण्णवर यांच्यावर कायदेशीर कारवाई करून न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.




