बेलगाम प्राईड /रवि कोकितकर ग्रामीण भागातील हिंडलगा गावात राहणारे. एका साध्या परिवारात जन्म पण स्वप्न देव,देश, धर्माच रक्षण करणारे शिक्षण संपल्यावर स्वतचा हॉटेल व्यवसाय चालवत धर्माचे काम करत होते. सर्वप्रथम बजरंग दलचे कार्यकर्ता म्हणून काम करत. नंतर बेळगाव पश्चिम विभागीय अध्यक्षची धूरा त्यानी संभाळली लव जिहाद,धर्मांतरण तसेच धर्मविरोधी कार्यंचा पर्दा फाश करण्याच काम त्यानी युद्ध पातलीवार केले आहे.
त्या कामाची पोचपावती त्यांना बेळगावचे तालुका अध्यक्ष पद देण्यात आली यानंतर हिंदुराष्ट्र सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष धनंजय भाई देसाई यांनी त्यांच्या कामाची दखल घेत त्यांना हिंदुराष्ट्र सेनेची कर्नाटकची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर दिली. गो रक्षा समाज सेवा यामध्ये त्यांनी प्राण पणाला लाऊन काम केले. हजारो गोमातेची कत्तल थांबवली हजारो मुली लव्ह जिहादच्या जाळ्यातून त्यांची सोडवनुक केली, हजारो कार्यकर्त्यांना धर्माचे काम करायला प्रेरित केले.
त्यानंतर त्यांना श्री राम सेना बेळगावचे जिल्हा अध्यक्ष नंतर तीन जिल्ह्याचे विभागीय अध्यक्ष पद देऊन त्यांना गौरविण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रेरणा आणि स्वतंत्र वीर सावरकर यांचे विचार, दादांची जिद्द आणि धर्मावरचे प्रेम, कार्य आणि सर्व कार्यकर्त्यांच्या इच्छेमुळे, श्री राम सेना राष्ट्रीय अध्यक्ष श्री प्रमोदजी मुतालिक यांनी आज त्यांना उत्तर कर्नाटक अध्यक्षपद देऊन गौरविण्यात आले. लाखोंच्या मनातील इच्छा आज पूर्ण झाली असून रवी कोकीतकर हे कर्नाटक अध्यक्ष झाले.




