Uncategorized
Trending

शस्त्र बाळगणाऱ्या तिघांना माळ मारुती पोलिसांनी केले अटक

बेलगाम प्राईड : माळमारुती पोलिसांनी धारदार शस्त्र बाळगणाऱ्या संशयितांना अटक करून त्याच्या जवळील धारदार तलवार जप्त केली आहे.

शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अलीकडील दिवसांत चोरीच्या घटना वाढल्यामुळे, शहरातील शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी संशयित व्यक्तींची तपासणी करत असताना बेळगाव शहरातील कणबर्गी गावाजवळील क्रिकेट स्टेडियम परिसरात फिरणाऱ्या अटक करून त्यांच्या जवळील तलवार जप्त करून त्याला अटक करण्यात आले आहे.

पोलिसांनी अरुण राम होरकेरी (32), रा.ज्योतिर्लिंग गल्ली, कणबर्गी,विक्रम करप्पा नायक (28), रा. मदकर गल्ली, कणबर्गी राहुल ज्योतिबा उचगावकर (31), रा. सिद्धेश्वर नगर, कणबर्गी हे तिघेही हिरो होंडा मोटारसायकलवरून धारदार तलवार घेऊन जात असते वेळी गस्तीवर असलेल्या पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता त्यांच्याकडे एक तलवार आढळली पोलिसांनी त्यांच्याकडून शस्त्र तसेच अंदाजे रु.5,000/- किमतीची मोटारसायकल जप्त केले आहे.

सदर प्रकरणी माळमारुती पोलिस ठाण्यात गुन्हा क्र.नं.180/2025 कलम 27(1) इंडियन आर्म्स अ‍ॅक्ट आणि कलम 97 के.पी. अ‍ॅक्ट अंतर्गत गुन्हा नोंदवून कायदेशीर कार्यवाही सुरू करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

या कारवाईत सहभागी झालेल्या पीएसआय तसेच पोलिस कर्मचाऱ्यांच्या कार्याचे पोलिस आयुक्त, बेळगाव शहर व डीसीपी यांनी कौतुक केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!