
बेलगाम प्राईड /बेळगाव तलाठी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर चार चाकी वाहन लावून कार्यालयात येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना अडथळा निर्माण करण्याचा प्रकार एका खाजगी व्यक्तीने केला आहे. ईश्वर शेट्टी नामक या व्यक्तीने तलाठी कार्यालयाच्या प्रवेशद्वारा समोर दिवसभर वाहन मधोमध पार्किंग केल्यामुळे तलाठी कार्यालयात कामासाठी येणाऱ्या नागरिकांना एक प्रकारचा अडथळा निर्माण केला आहे.
या संदर्भात तलाठी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी वाहन साईडला काढण्यासाठी विनंती केली असता त्याच व्यक्तींवर उद्धट उत्तरे देऊन दमदाटी केली जात आहे. कामासाठी येत असलेल्या नागरिकांनाही त्रास होत असल्यामुळे नागरिकांनी याच्या संदर्भात उलट सुलट प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.
या व्यक्तीवर कुणाचा आशीर्वाद आहे असे या भागातील नागरिकांनी चर्चा केली जात आहे यावर वरिष्ठ अधिकाऱ्याने लक्ष घालून जनतेचा अडथळा दूर करतील का असे वर्तविले जात आहे.




