
बेलगाम प्राईड/ बेळगाव येथील पतंजली योग समिती मार्फत येथील सोमनाथ लॉन शिवराज कॉलनी या ठिकाणी दहा दिवसाचे मोफत योग शिबिराचे आयोजित करण्यात आले आहे .या शिबिराचे सोमवार 6 रोजी सकाळी 6 वाजता शुभारंभ करण्यात आला.
उपस्थित असलेल्या शिबिरार्थींना योगाचे प्रशिक्ष योगशिक्षिका अंजना हलकर्णी यांनी प्रशिक्षण देण्यास प्रारंभ केला.या शिबरार्थीना दररोज सकाळी 6 ते 7-30 या वेळेत योगशिक्षण दिले जाणार आहे. या शिबिराचा समारोप 15 रोजी होणार आहे.
योग शिक्षिका म्हणून अंजना हलकर्णी यांनी योगा विषयी प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी योगशिक्षिका अंजना हलकर्णी यांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन राजश्री हसबे, इंदिरा भोगण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी भारती कोकितकर ,ज्योती पावशे, ज्योती साळुंखे, संगीता माऊथ, राजश्री पाटील यांनी शुभेच्छापर भाषणें केली.
सोमनाथ लॉणचे संचालक अनंत कंग्राळकर यांनी सहकार्य केले असून येथील महिला मंडळाने देखील पुढाकार घेऊन हे शिबिर यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.या शिबिराला सर्वांचे सहभाग लाभले आहे.




