
राज्यस्तरीय शालेय तायक्वांडो चॅम्पियनशिप मध्ये यक्षित युवा फाउंडेशनचे खेळाडूचे यश
बेलगाम प्राईड/ यक्षित युवा फाउंडेशनच्या राव युवा अकादमीतील तायक्वांदो खेळाडूंनी कर्नाटक सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने धारवाड येथील आर. एन. शेट्टी स्टेडियम येथे आयोजित केलेल्या राज्यस्तरीय तायक्वांदो चॅम्पियनशिप मध्ये उल्लेखनीय यश मिळवले आहे.
बेळगाव जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करताना अनुकरणीय कौशल्य आणि खिलाडू वृत्तीचे प्रदर्शन करताना बेन्सन्स इंग्लिश मीडियम स्कूलच्या मोहम्मदशफी लतीफशाह चांदशाहने ४१ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकवला आहे. तर लिटिल स्कॉलर्स अकादमीच्या श्राव्य शानबाघने तिच्या संबंधित विभागात कांस्यपदक जिंकली. कर्नाटकातील जिल्ह्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या जिल्हास्तरीय सुवर्णपदक विजेत्यांकडून जोरदार स्पर्धा होत असताना या क्रीडापटूनी ही कामगिरी दाखवली.
या विजयासह, मोहम्मदशफीला या महिन्याच्या अखेरीस नागालँडमध्ये होणाऱ्या स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या राष्ट्रीय तायक्वांदो चॅम्पियनशिपमध्ये कर्नाटकचे प्रतिनिधित्व करण्याचा मान मिळाला आहे. ह्या खेळाडूना आंतरराष्ट्रीय तायक्वांदो प्रशिक्षक आणि यक्षित युवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तायक्वांदो मास्टर श्रीपाद आर. राव यांच्या सतत कठोर प्रशिक्षण आणि मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे.
या प्रसंगी बोलताना फाउंडेशनचे अध्यक्ष राव यांनी खेळाडूंच्या कामगिरीबद्दल आनंद व्यक्त केला आणि म्हटले की, “या तरुण खेळाडूंनी हे दाखवून दिले आहे. की शिस्त, दृढनिश्चय आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे उल्लेखनीय परिणाम मिळतात. त्यांचा प्रवास इच्छुक खेळाडू आणि पालक दोघांसाठीही प्रेरणास्रोत आहे”. यक्षित एनजीओच्या वचनबद्धतेला पुन्हा पुष्टी देत तायक्वांडो मास्टर राव म्हणाले, “पुढील दिवसात ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत पार्श्वभूमीतील प्रतिभेचा शोध सुरू ठेवण्यासाठी तसेच त्यां क्रीडापटूंचा प्रवासाला प्रोत्साहन देण्यासाठी सर्व प्रकारचे आवश्यक समर्थन आणि सहाय्य प्रदान करण्याच्या व्यापक क्षमतेसह फाउंडेशनने अद्वितीय योजना आखल्या आहेत”




