
बेलगाम प्राईड/ विजापूरमधील इंडी येथे रविवारी 12 ऑक्टोबर 2025 रोजी फिजिकल फिटनेस स्पोर्ट्स असोसिएशनच्या द्वितीय राष्ट्रीय पातळीवरील कराटे चषक स्पर्धा पार पाडल्या. या स्पर्धेत विविध भागातून 1000 हून अधिक कराटेपटूंचा सहभाग होता. या स्पर्धेत बेळगांवच्या डायनॅमिक शोटोकान कराटे-डू (DSKI) च्या 37 कराटे पटूंनी भाग घेतला होता. यामध्ये बऱ्याच जणांनी उत्तम प्रदर्शन करून विजय संपादन केले.

यामध्ये काता आणि कुमिते या प्रकारामध्ये 26 सुवर्ण पदक, 20 रौप्यु पदक आणि 28 कांस्य पदके पटकावली आहेत. तर DSKI ही संस्था तिसऱ्या जनरल विजेतेपदाची मानकरी ठरली आहे. यांचा सत्कार समारंभ रविवार 16 ऑक्टोबर 2025 रोजी कंग्राळी खुर्द येथे पार पडला. या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून जयराम पाटील (ग्रामपंचायत सदस्य कंग्राळी बी.के), प्रशांत पवार (पत्रकार, कंग्राळी बी. के), नवनाथ पुजारी (ग्रामपंचायत सदस्य कंग्राळी बी. के), सौ. मिनाक्षी मुतगेकर (SDMC सदस्म, कंग्राळी KH), बसवराज मलकन्नावर (सामाजिक कार्यकर्ते) उपस्थित होते.
याना मल्लेश चौगुले (अध्यक्ष DSKI), शिहान. नागेश पाटील (मुख्य प्रशिक्षक), सेन्सेई. मितेश निलजकर, गायत्री सामजी, गौरव पाटील, आणि मनीषा पाटील यांचे मार्गदर्शन आणि प्रोत्साहन लाभले.




