
बेलगाम प्राईड/ दीपावली निमित्त भारतीय जनता पार्टी बेळगाव ग्रामीण व बेळगांव महानगर विधानसभा क्षेत्रामधील सर्व हिंदू बांधवांना सुगंधी उटन्याची 25,000 पाकिटे मोफत वितरण करण्याचा स्तुत्य उपक्रम आज गुरुवार सकाळी राबविण्यात आला.
दीपावली हा हिंदुंचा सर्वात मोठा सण अंधारातून प्रकाशाकडे नेणारा हा सण आहे. हा सण अभ्यंग स्नानाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही आणि म्हणूनच अभ्यंग स्नानासाठी सुगंधी उटणे हे लागते. घरातील माताभगिनी खोबरेल तेलामध्ये किंवा सुगंधी तेलामध्ये मिश्रण करून पहाटे पहाटे घरातील अबाल वृध्दांना उटणे लावून आरती करून अभ्यंग स्नान घालतात.
उटण्याचे हे महत्त्व ओळखून भारतीय जनता पार्टी बेळगाव ग्रामीण व बेळगांव महानगर विधानसभा क्षेत्रामधील सर्व हिंदू बांधवांना आज गुरुवार सकाळी सुगंधी उटन्याची 25,000 पाकिटे मोफत वितरीत करण्यात आली. तसेच सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा देण्यात आल्या. भाजपा बेळगाव ग्रामीणचे नेते धनंजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.




