Uncategorized
Trending

जनगणती चुकू नये यासाठी हालगा मराठा समाज्याच्या वतीने घरोघरी विचारपूस

बेलगाम प्राईड/कर्नाटक सरकारने सुरू केलेले सामाजिक व शैक्षणिक जनगणतेचे काम अंतिम टप्प्यात आले असल्यामुळे हलगा गावातील कोणत्याही नागरिकाची जनगणती चुकू नये यासाठी हालगा मराठा समाज सुधारणा मंडळाच्या वतीने प्रत्येक घरोघरी जाऊन विचारपूस करण्याचे अभियान हाती घेण्यात आले या अभियानाचा शुभारंभ मराठा समाज सुधारणा मंडळाचे अध्यक्ष यल्लाप्पा सामजी यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवार दिनांक 6 रोजी सायंकाळी करण्यात आला

सरकारने सुरू केलेले हि सामाजिक व शैक्षणिक जनगणती फार महत्त्वाची आहे. यासाठी कोणत्याही नागरिक यापासून वंचित राहू नये. यासाठी सकल मराठा समाज बेळगावच्या वतीने आव्हान केल्याप्रमाणे हलगा मराठा समाज सुधारणा मंडळाने हे विचारपूस करण्याचे अभियान खाती घेतले आहे.प्रत्येक घरोघरी जाऊन जनगणती झाली की नाही याची विचारपूस हलगा मराठा समाज सुधारणा मंडळाचे कार्यकर्ते करत आहेत. जनगणतेवेळी ज्या नागरिकाची जनगणती नजरचुकीने राहिले असल्यास,त्या नागरिकाचे नाव, विद्युत क्रमांक, यू एच आय डी क्रमांक घेऊन यादी बनवत आहेत. तसेच ही यादी संबंधित अधिकाऱ्याला दिले जाईल व त्या नागरिकांची जनगणती 10 ऑक्टोबर पूर्वी करून घेण्याचा निर्धार या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे

यावेळी मराठा समाज सुधारणा मंडळाचे अध्यक्ष यल्लाप्पा सामजी, पुंडलिक मास्तमर्डी, पिराजी मोरे, शिवाजी संताजी, सदानंद बिळगोजी, मनोहर संताजी,गणपत मारिहाळकर, अनिल शिंदे, सागर बिळगोजी, भुजंग सालगुडे,निलेश संताजी,व इतर मराठा समाज सुधारक मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!