Uncategorized
Trending

खासदार जगदीश शेट्टर यांनी खराब झालेल्या तिसर्‍या रेल्वे गेट उडान पुलाची पहाणी केली 

 बेलगाम प्राईड /बेळगाव मधील रहिवाशांकडून असंख्य तक्रारींना उत्तर देताना बेळगाव लोकसभेचे सदस्य जगदीश शेट्टर यांनी आज तिसऱ्या रेल्वे ओव्हर ब्रिज वरील खराब झालेल्या रस्त्याच्या परिस्थितीची पहाणी करण्यासाठी अनगोळ नाक्या नजीक असलेल्या तिसऱ्या रेल्वे गेट क्रमांक ((एल.सी. क्रमांक 1 38१) भेट दिली.

पहाणी दरम्यान खासदारांनी खराब झालेल्या रस्त्या बद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक कार्यकारी अभियंता (बेळगाव उपविभाग) श्री कोलेकर यांना त्वरित दुरुस्ती करण्याचे आणि एका आठवड्यात काम पूर्ण होईल याची खात्री करुन घेतली. उड्डाणपूल मूळतः दक्षिण पश्चिम रेल्वे अभियंत्यांनी बांधलेला आहे आणि त्यानंतर त्यांना देखभालसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सोपविण्यात आला आहे.

दक्षिण पश्चिम रेल्वेच्या बेळगाव झोनचे सहाय्यक अभियंता श्री मायनाका देखील त्या ठिकाणी उपस्थित होते. आणि खासदारांना संरचनेच्या तांत्रिक तपशीलांबद्दल माहिती दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!