
बेलगाम प्राईड/ जिल्हा कुस्तीगीर संघटनेच्या वतीने नववर्षाच्या प्रारंभी 4 जानेवारीला बेळगावच्या प्रसिद्ध आनंदवाडी कुस्ती आखाड्यात कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात येणार आहे. या संदर्भात वैभव खाडे यांच्या अध्यक्षस्थानी पार पडलेल्या बैठकीत सर्वांनुमते निर्णय घेण्यात आला.
बैठकीत कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष मारुती गाडी यांनी संघटनेच्या कार्याची माहिती दिली. माजी आमदार परशुरामभाऊ नंदिहळ्ळी यांच्या मार्गदर्शनाखाली,सलग पंधरा वर्षे संघटनेच्या वतीने कुस्ती आखाड्याचे आयोजन केले जात आहे. 4 जानेवारी रोजी होणाऱ्या बैठकी संदर्भात बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. त्याचबरोबर याच बैठकीत महादेव पाटील (धामणे) यांची संघटनेच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. बैठकीत वैभव खाडे, अशोक हलगेकर, हिरालाल चव्हाण, वाय पी नाईक यांनी मनोगत व्यक्त केले.
बैठकीला संतोष होनगल,सुरेंद्र देसाई,भर्मा पुंजीगौडा, संजय चौगुले, मलप्पा हिंडलेकर,मनोहर गावडे, भोमेश बिर्जे, भरमाण्णा हलगेकर,मारुती नाईक, मोहन मोरे व अन्य सदस्य उपस्थित होते.




