
बेलगाम प्राईड/ स्विमर्स क्लब बेळगाव आणि अॅक्वेरियस स्विम क्लबचा जलतरणपटू बेळगावचे प्रतिनिधित्व करणाऱ्या दर्शन वरूर याने नुकत्याच पार पडलेल्या दसरा सीएम कप -2025 राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेमध्ये रौप्य आणि कांस्य पदक अशी दोन पदके जिंकून बेळगाव शहराचे नाव उज्वल केले आहे.
म्हैसूर येथील चामुंडी विहार अॅक्वाटिक कॉम्प्लेक्स स्विमिंग पूल येथे 22 ते दि. 25 सप्टेंबर दरम्यान दसरा सीएम कप 2025 राज्यस्तरीय जलतरण स्पर्धा यशस्वीरित्या पार पडली. या स्पर्धेत बेळगावच्या दर्शन वरूर याने रौप्य आणि कांस्य पदकाची कमाई केली. दर्शन हा आपले जलतरण प्रशिक्षक उमेश कलघटगी, अक्षय शेरेगर, अजिंक्य मेंडके, नितीश कुडुचकर, गोवर्धन काकतकर आणि इम्रान उचगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली केएलईच्या सुवर्ण जेएनएमसी ऑलिंपिक आकाराच्या स्विमिंग पूल येथे पोहण्याचा सराव करतो. त्याला आई-वडिलांसह डॉ. प्रभाकर कोरे (अध्यक्ष, केएलई सोसायटी), जयंत हुंबरवाडी (अध्यक्ष, जयभारत फाउंडेशन), अविनाश पोतदार, श्रीमती मानीक कपाडिया, श्रीमती लता कित्तूर, सुधीर कुसाणे, प्रसाद तेंडोलकर आदींचा पाठिंबा आणि प्रोत्साहन लाभत आहे.




