Uncategorized
Trending

महापालिकेचे दुर्लक्ष : रहदारी विभागाचे एसीपी जोतिबा निकम यांनी जाणले गांभीर्य

बेलगाम प्राईड / तिसऱ्या रेल्वे गेट उड्डाणपुलाच्या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी करण्यासाठी अनेक सत्याग्रह आंदोलने करूनही प्रशासनाने अद्याप कारवाई केलेली नाही. अधिकाऱ्यांनी काम लवकरच सुरू करण्याचे आश्वासन दिले मात्र याकडे दुर्लक्ष केले याची दखल घेतली वाहतूक पोलिसांनी 

वारंवार पडणाऱ्या पावसामुळे होत असलेल्या खड्ड्यांमुळे या मार्गावर प्रवास करणे अत्यंत धोकादायक बनले आहे. हा मार्ग अपघाताचा मार्ग बनला आहे.वारंवार तक्रारी करूनही सार्वजनिक बांधकाम विभागाने कोणतीही दुरुस्ती केली नाही.या रस्त्याच्या गंभीर परिस्थितीचे आणि वारंवार होणाऱ्या अपघातांची नोंद घेत रहदारी विभाग एसीपी जोतिबा निकम त्यांच्या तीन सहकारी वाहतूक पोलिसांनी या मार्गावरील खड्डे दगडांनी भरण्यात आले जेणेकरून विशेषतः रात्रीच्या अपघात टाळण्यात येतील

महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला वारंवार सूचना देऊनही कोणताही प्रतिसाद न मिळाल्याबद्दल वाहतूक पोलिसांनी नाराजी व्यक्त केली. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यासाठी निविदा काढली आहे. आणि काम लवकरच सुरू होण्याची अपेक्षा आहे. दरम्यान धोकादायक खड्डे भरण्यासाठी वाहतूक पोलिसांच्या सक्रिय प्रयत्न करून ठुकादायक प्रकार टाळण्यात आल्याने जनतेकडून त्याचे कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!