Uncategorized
Trending

मिनी अलिंपिक ॲथलेटिक्स स्पर्धेची निवड चाचणी संपन्न 

बेलगाम प्राईड/ जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने 14 वर्षांखालील मुलां मुलींसाठी जिल्हा ॲथलेटिक्स संघ निवड चाचणी व स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या ही निवड चाचणी जिल्हा स्टेडियम, नेहरू नगर, बेळगाव या ठिकाणी संपन्न झाली या स्पर्धेत जिल्यातून ऐकून 100 हून अधिक खेळाडूनी सहभाग घेतला होता.

यामध्ये ऐकुन 10 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. त्यात समक्ष कुंभार 100 मी. 200 मी. सक्षम 4×100 मी रिले विराज कुगजी 400 मी 4×100 मी रिले अनोज हंनगोजी 400 मी 600 मी 4×100 मी रिले प्रार्थ कणबरकर तर थाळी फेक मुलीन मध्ये जोस्तना हंजिरकर 100 मी .200 मी 4×100 रिले माधुरी पाटील 200 मी 400 मी 4×100 स्नेहल नाईक 600 मी 4×100 समीक्षा कर्तसरकर 200 मी 400 मी 4×100 मी रिले सेजल धामणेकर लांब उडी उंच उडी 4×100 रिले व राखिव म्हणून ऋतुजा जाधव भला फेक याविभागात निवड करण्यात आले आहेत. 6 ते 8 नोव्हेंबर 2025 दरम्यान श्री कंटेरवा स्टेडियम बेंगळुरू येथे राज्यस्तरीय मिनी ऑलिंपिक स्पर्धेत बेळगाव जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतील

या प्रसंगी प्रमुख पाहुणे बेळगांव जिल्हा ॲथलेटिक्स असोसिशन बेळगांव चे अध्यक्ष किरण जाधव त्याच बरोबर उपाध्यक्ष संभाजी देसाई सचिव अशोक शिंत्रे,क्रीडा भारती कर्नाटक प्रांत सह कार्यवाह विश्वास पवार, व कार्यक्रमाचे सचिव म्हणून डॉ.मधुकर देसाई या सर्व मान्यवरानी निवड चाचणी व स्पर्ध्येचे उद्घाटन केले अशोक शिंत्रे यांनी प्रस्तावना व स्पर्धेची माहिती दिली. किरण जाधव यांनी अध्यक्षीय भाषण म्हणून खेळाडूंना मार्गदर्शन केले व उमेश बेळगुंदकर यांनी आभार व्यक्त केले.

स्पर्धेला चालना दिली या स्पर्धेसाठी पंच म्हणून शिरीष सांबरेकर,महेश मोरे,अनंत पाटील,सूरज पाटील,वैभव गडकरी,आकाश लाड,मयुरी पिंगट,ऐश्वर्या नेसरकर, यांनी केले या प्रसंगी उपस्थित विजेत्या खेळाडूंना प्रमाण पत्र आणि पदक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले उकृष्ठ धावपटू म्हणून मुलाच्या मध्ये सक्षम कुंभार व मुलींन मध्ये माधुरी पाटील या दोघांना चषक देऊन सन्मानित करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!