Uncategorized
Trending

मराठी भाषिकांत एकी आणण्याचा उपक्रम किल्ल्यातून : शुभम शेळके 

बेलगाम प्राईड /सीमाभागातील मराठी भाषिकांमध्ये एकी असल्याने दिवाळी निमित्त किल्ले बांधण्याच्या उपक्रमातून शिवरायांच्या वारशाचे जतन केले जात आहे. 

शिवरायांच्या इतिहासाची आठवण म्हणजेच किल्याणचा उपक्रम आहे. मुतगे गावातील शिवप्रेमींनी असे उपक्रम राबवत मराठी भाषिकांमध्ये एकी आणली पाहिजेत असे म. ए. समितीचे युवा नेते शुभम शेळके यांनी सांगितले.

मुतगे येथील शिवाजी नगरच्या विजयदुर्ग किल्लाचे उदघाटनपर भाषणात ते बोलत होते. यावेळी ग्राम पंचायत सदस्य सुधीर पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रम पार पडला.मनोहर कडेमनी यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या मुर्तीचे पूजन करण्यात आले. दीपप्रज्वलन मनोहर हुदरे राजू पाटील यांच्या हस्ते करण्यात आले

कार्यक्रमाला किरण पाटील, अनिल पाटील, भाऊ पाटील, महेश पाटील, भावकाना पाटील, यल्लापा बिरादार, एन. डी. पाटील, भैरु पाटील, प्रभाकर पाटील आणि गावातील इतर कार्यकर्ते उपस्थित होते. भावेश बिरादार स्वराज पाटील व रुतिकेश पाटील उमाजी पाटील सुजल पाटील यांनी हा किल्ला साकारला होता. तसचे शिवाजी नगर पहिला क्रास येथील सिंहगड, चावडी गल्ली येथील लोहगड व शिवाजी नगर दुसरा क्रास येथील सुवर्ण दुर्ग या सर्व किल्लाचे उद्घाटन ग्रामपंचायत सदस्य सुधीर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!