
बेलगाम प्राईड /विरोधी पक्षनेते श्री. आर अशोक यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या शिष्टमंडळाने बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल आणि बेळगांव तालुक्यातील नेसर्गी, नागनूर आणि तारिहाळ गावातील पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या जमिनींना भेट दिली. आणि पिकांच्या नुकसानीची पाहणी केली तसेच शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले.
शेतकऱ्यांच्या अश्या बिकट परिस्थितीवर दुर्लक्ष करणाऱ्या आणि काळजी नसलेल्या राज्य सरकारने बाधित लोकांना आणि शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी धाव घ्यावी आणि तातडीने मदत जाहीर करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.
या प्रसंगी पूर्व राष्ट्रीय सरचिटणीस श्री. सी.टी. रवीजी, विधान परिषदेचे सदस्य श्री. एन. रविकुमारजी, बेळगाव जिल्हाध्यक्ष श्री. सुभाष पाटील, खासदार श्री. रमेश जिगजिनगीजी, माजी मंत्री श्रीमती शशिकला जोल्ले, श्री रमेश जारकीहोल्ली, राज्यसभा सदस्य श्री इराण्णा कडाडी, आमदार श्री अभय पाटील, श्री दुर्योधन आयहोल्ली, श्री सिद्धू सनदी, श्री विठ्ठल हलगेकर, श्री संजय पाटील, श्री धनंजय जाधव, श्री महंतेश कवटगीमठ, श्री महंतेश दोड्डगौडर, श्री विश्वनाथ पाटील, श्री जगदीश मेटगुट, श्री अरविंद पाटील, श्री प्रदीप पाटील, श्री शेखर कुलकर्णी, श्री मल्लिकार्जुन माद्दन्नावर, श्री मुरगेंद्रगौडा पाटील, पक्षाचे पदाधिकारी, जिल्हाधिकारी, अधिकारी, स्थानिक प्रमुखमंडळी व ग्रामस्थ उपस्थित होते.




