परवानगी नसलेल्या मार्गावरून मिरवणूक काढून केली दगडफेक
दगडफेकीच्या परिसराची पोलीस आयुक्तांनी केली पाहणी

बेलगाम प्राईड /धार्मिक मिरवणुकीसाठी ठरलेल्या मार्गावरून न जाता खडक गल्ली परिसरातून मिरवणूक लिहिण्यात आली यावेळी मिरवणुकीत उपस्थित असलेल्या युवकांनी दगडफेक केल्याने हा वाद निर्माण होऊन शांतता भंग करण्याचा प्रकार घडला ही घटना शुक्रवारी रात्री साडेनऊच्या सुमारास बेळगाव शहरातील खडक गल्ली परिसरात घडली.

खडक गल्लीतील दगडफेक घटनेच्या ठिकाणी शहराचे पोलीस आयुक्त भूषण बोरसे शुक्रवारी रात्री स्वतः भेट देऊन पाहणी केली.स्थानिकांकडून व पोलिसांकडून माहिती घेतल्यानंतर बोरसे पत्रकारांशी बोलताना म्हणाले, खडक गल्लीमध्ये दोन समुदायांमध्ये वाद झाला. आज धार्मिक कार्यक्रम होता. त्यासाठी ठराविक मार्ग निश्चित करण्यात आला होता. मात्र काही जण त्या मार्गाऐवजी दुसऱ्या मार्गाने आले. स्थानिकांनी त्यावर प्रश्न उपस्थित केला आणि त्यातून वाद निर्माण झाला.
स्थानिकांनी दगडफेकीची तक्रार दिली आहे. ज्यांनी चूक केली आहे त्यांच्यावर कारवाई केली जाईल. या घटनेत कुणालाही दुखापत झालेली नाही. दोन्ही समुदायातील ज्येष्ठांनी तात्काळ मध्यस्थी करून हा वाद मिटविण्यात आला. मूळ मार्ग सोडून दुसऱ्या मार्गाने जाणे चुकीचे झाले असेही त्यांनी मान्य केले.
‘आय लव्ह’ बॅनर प्रकरणाबाबत मनपाला सांगितले जाईल. परवानगी घेऊनच बॅनर लावण्याचे निर्देश दिले जातील असे पोलीस आयुक्त बोरसे यांनी स्पष्ट केले.




